लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

कॅटलिस्ट फाऊंडेशन


आमच्या विषयी .....

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही ‘कॅटलिस्ट फाऊंडेशनची’ स्थापना केली आहे. या फाऊंडेशनचा हेतू कार्यक्रम,चर्चा, सेमिनार यांच्या सहाय्याने सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भातील वेगवेगळे प्रश्न मांडणे व सोडविण्यासाठी मदत करणे हा आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी मुले, ज्यांना कष्ट करून आयुष्यात मोठे व्हायचे आहे अशा मुलांच्या पंखाना बळ देणे हा संस्थेचा एक उद्देश आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या सुविधा तयार करण्यासाठी लागणारी मदत करण्यासाठी देखील संस्था काम करणार आहे. काही समाजसेवी संस्था समाजात उत्तम कार्य करत आहेत, मात्र त्यांना कामांमध्ये काही अडचणी येत असतात, अशा संस्थांना मदत होण्यासाठी समन्वय साधण्याचे काम देखील ‘कॅटलिस्ट फाऊंडेशन’ करणार आहे.

अनेक वर्ष पत्रकारिता केल्यानंतर स्वत:ची जनसंपर्क संस्था सुरु करणाऱ्या श्री. सुनील माने यांनी या फाऊंडेशनची स्थापना केली आहे. पुण्याचे खासदार गिरीशजी बापट हे या संस्थेचे पालक तर लष्करातून सेवानिवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी.बी शेकटकर या संस्थेचे मेंटॉर आहेत.

बदलत्या युगाप्रमाणे माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आजची तरुणाई मोबाईल, संगणक आणि इंटरनेट सारख्या डिजिटल माध्यमांना प्राधान्य देते. आमची संस्था प्रामुख्याने तरुणांसाठी काम करणारी संस्था असल्याने याचाच एक भाग म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा चरित्रपट वेबसाईटच्या माध्यमातून साकारण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला.

थोर साहित्यिक, क्रांतिकारक, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे ' सुवर्ण ' औचित्य साधून त्यांच्या असीम कार्याची व्याप्ती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे, हा प्रांजळ प्रयत्न आमचा यामागे आहे. तो आपल्याला नक्कीच आवडेल आणि आमच्या या उपक्रमाला आपल्याकडून भरभरून प्रतिसाद लाभेल. याबाबत खात्री वाटते.

आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय. आमच्या या प्रयत्नामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा काही राहून गेल्यास अथवा याव्यतिरिक्त अधिक माहिती आपण देऊ इच्छित असाल तर त्याचे ही आम्ही स्वागत करतो ...

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला येथे कळवा.....


ऋणनिर्देश

कॅटलिस्ट फाँडेशनची स्थापना केल्यानंतर सातत्याने काही तरी नवीन करायचे या विचाराने आम्ही कार्यरत आहोत. हाच ध्यास मनामध्ये बाळगून आम्ही संशोधन केले तेंव्हा आम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगणारी वेब साईट उपलब्ध नसल्याचे समजले. अण्णाभाऊंचे जीवन कार्य डिजिटल स्वरूपात जनतेसमोर आणण्याचा निश्चय आम्ही केला. खरं तर अण्णाभाऊ साठे यांचे अलौकिक व्यक्तिमत्व, त्यांची व्यापक साहित्य संपदा, स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान या सर्व गोष्टी एका वेबसाईट मध्ये शब्दबद्ध करणे अत्यंत अवघड होते. तरीही अत्यंत कमी वेळात ही वेबसाईट आम्ही तयार केली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. सदानंद मोरे, सचिव श्रीमती मीनाक्षी पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक मा. डॉ संजय संभळकर , महावीर महाविद्यालय कोल्हापूरचे प्रा. डॉ. शरद गायकवाड, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री सुनील खंडागळे, ASTRA चे ॲडव्होकेट श्री राजेश मोटेवाल,डाॅ.नितिन रणदिवे समन्वयक (सामाजिकशास्ञे विद्याशाखा) दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे, सहा. प्राध्यापक मराठी विभाग, कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्याविषयी ऋणनिर्देश व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही हे शिवधनुष्य पेलू शकलो नसतो.

मा. लेफ्टनंट जनरल डी.बी शेकटकर

(मेंटॉर कॅटलिस्ट फाऊंडेशन)

खासदार श्री गिरीश बापट

(पालक कॅटलिस्ट फाऊंडेशन)

श्री सुनील माने

(अध्यक्ष्य कॅटलिस्ट फाऊंडेशन)