लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
  • Creating a country for every citizen
  • Ideological Leader for youth generation
  • Ideological Leader for youth generation
  • Ideological Leader for youth generation

अण्णाभाऊ साठे


अण्णाभाऊ साठे - एक अलौकिक व्यक्तिमत्व : (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). “टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही...” या म्हणीची तंतोतत प्रचिती यावी, असा संघर्षमय प्रवास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाट्याला आला. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० साली सांगली येथील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहानश्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ साठे तर आईचे नाव वालूबाई होते. अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम साठे पण पुढे आपल्या सार्वजनिक कार्यामुळे ते समस्त समाजाचे ‘अण्णा’ झाले. अण्णाभाऊंचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीतून गेले. तत्कालीन जातीय उतरंडीची झळ बसल्याने शिक्षणाची आस असूनही त्यांना तांत्रिकदृष्ट्या शिक्षण प्राप्त होऊ शकले नाही. परंतु, त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली ते आपल्या वडिलांसोबत मुंबईला आले. चरितार्थासाठी त्यांनी कोळसे वेचले. मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी केली. असे पडेल ते काम करत अण्णाभाऊंचे बालपण सरले. मुंबईत वास्तव्यास असताना कामगारांचे कष्टमय जीवन त्यांनी जवळून अनुभवले. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद जडला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. -आणखी वाचा
“साहित्याला केवळ कल्पनेचे पंख असून चालत नाही,
तर वास्तवाचे पायही असावे लागतात.”

अण्णाभाऊंची लेखणी: कोणताच लेखक हा जन्मजात प्रतिभावंत नसतो. त्याच्यात उपजत असलेली संवेदनशीलता त्याला समाजाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते. आणि त्याचे अंतर्मनावर उमटलेले पडसाद त्याच्या लिखाणातून प्रेरित होऊन असंख्य वाचक वर्गास अंतर्मुख होण्यास भाग पाडतात. अण्णाभाऊंचे अथांग साहित्यदेखील यापैकीच एक असे म्हणावे लागेल. -आणखी वाचा